आपल्या ओळखीच्या बाईला आपण खरंच ओळखतो का?
काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाचं नाव वाचलं.गुज अंतरी.मनातलं काहीतरी.नाव वाचून पहिला विचार आला, आपण सगळेच काही ना काही मनात ठेवतो.काही गोष्टी सांगतो.काही अर्धवट सांगतो.आणि काही कुणालाच सांगत नाही.पण बाईच्या बाबतीत हा न सांगितलेला भाग थोडा मोठा असतो का?Ruchita Sahil यांचा Antariche Guj वाचताना हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत राहिला.आपल्याला आपल्या घरातल्या बायका माहीत असतात.आई काय करते हे माहीत असतं...





